जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.श्री मारुती मुळे व वित्त विभाग टीम यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या आवारात वृक्ष लागवड उपक्रम
श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे
तिरदशेत ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.
हर घर तिरंगा – तिरदशेत गाव
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरदशेत ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.